चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
मकर संक्रांतीनिमित्त ग्रामस्थ मंडळ व तरुण मंडळ सुळये (ता. चंदगड) यांच्या वतीने एका माणसाने बैलगाडी ओढण्याच्या शर्यतीचे आयोजन केले आहे. रविवार दि. १२ जानेवारी २०२५ रोजी ही स्पर्धा होणार असून स्पर्धेसाठी २५१ रुपये प्रवेश शुल्क आहे. एक मिनीट वेळ असलेल्या या स्पर्धेसाठी विजेत्यांना अनुक्रमे ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१, ७०१, ५०१ अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहे.
हेरे गावचे उपसरपंच व भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष विशाल बल्लाळ यांच्या हस्ते सुळये येथे सकाळी १० वाजता स्पर्धेचे उद्घाटन होईल. स्पर्धेचे व्यवस्थापन शिवशक्ती तरुण मंडळ, भैरवनाथ तरुण मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळ सुळये यांच्या वतीने करण्यात येणार आहे. इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी विलास गावडे मो. 9420946802, सुधाकर केरवडेकर 8411040800, गौरव गावडे 9420863729, रमेश गावडे 9130585393 व चंद्रकांत गावडे 8412987210 यांच्याशी संपर्क साधावा.
No comments:
Post a Comment