अमर जोतिबा कोकितकर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
चंदगड तालुक्यातील ढेकोळी पैकी ढेकोळीवाडी येथील शेततळ्यात बुडून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना आज २५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली. अमर जोतिबा कोकितकर (वय वर्षे ११, रा. ढेकोळेवाडी, पो. सुरूते) असे शेततळ्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.
आज दिनांक २५ रोजी नाताळची सुट्टी असल्यामुळे अमर आपल्या मित्रा सोबत ढेकोळीवाडी येथील मधल्या मळ्यातील पवार यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा बुडून मृत्यू झाला. कोल्हापूर येथे शाळेला असलेला अमर शाळेला चार दिवस सुट्टी असल्यामुळे कुटुंबीयांसमवेत गावी आला होता, असे समजते. घटनेची वर्दी यल्लाप्पा लक्ष्मण कोकितकर (वय ३०, रा ढेकोळीवाडी) यांनी चंदगड पोलिसात दिली. या घटनची नोंद पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी करून पोलीस हेडकॉन्स्टेबल आनंदा नाईक यांच्याकडे तपासाची जबाबदारी दिली आहे. भारतीय नागरिक सुरक्षा सुविधा संहिता कलम १९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment