नागरदळे येथे रविवारी सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

26 December 2024

नागरदळे येथे रविवारी सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        नागरदळे (ता. चंदगड) येथील कै. एस. आर. देवण फाऊंडेशन व श्री नागनाथ हायस्कूल नागरदळे यांच्या वतीने रविवारी (ता. २९ डिसेंबर २०२४) सकाळी १० वाजता सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केल आहे. श्री नागनाथ हायस्कूल व मराठी विद्यामंदिर शाळेत होणाऱ्या स्पर्धेचे नागरदळे गावच्या सरपंच वर्षाराणी पाटील, उपसरपंच एकनाथ पाटील यांच्या हस्ते उदघाटन होईल. स्पर्धा ५ वी ते ७ वी लहान गट व ८ वी ते १०  वी मोठा गट अशी होईल. स्पर्धा मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास-नागरीकशास्र, बुद्धीमत्ता चाचणी, चालू घडामोडी आणि सामान्यज्ञान इत्यादी विषयांवर होईल. ५वी ते ७वी गटासाठी ५० प्रश्न १०० गुणासाठी १ तास कालावधी तर ८ वी ते १० वी गटासाठी ७५ प्रश्न १५० गुणासाठी १:३० वेळेचा कालावधी असेल.

    स्पर्धेचे किणी कर्यात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव देसाई यांच्या अध्यक्षस्थेखाली बक्षीस वितरण होणार आहे. यावेळी स्पर्धा परीक्षा काळाची गरज याविषयावर राम विद्यालय ज्युनियर कॉलेजचे सेवानिवृत्त प्राचार्य ए. एस. पाटील यांचे  मार्गदर्शन होईल. कार्यक्रम प्रसंगी एम. व्ही. पाटील,  (सचिव सर्वोदय शिक्षण संस्था कोवाड), श्री नागनाथ हायस्कूलचे मुख्याध्यापक अजित पाटील, नरसू देवण (सेवानिवृत्त मुख्याध्यापक), यशवंत सोनार (माजी सभापती पंचायत समिती चंदगड) आणि नारायण सामंत (मुख्याध्यापक मराठी विद्यामंदिर नागरदळे) हे उपस्थित राहतील. विजेत्यांना रोख बक्षिसे व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येईल.

No comments:

Post a Comment