चंदगड : सी एल वृत्तसेवा
कोरज (ता. चंदगड) येथून विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना दि. १२ जानेवारी २०२५ रोजी घडली. सौ. वैशाली विलास पाटील (वय ३२) असे बेपत्ता झालेल्या विवाहित महिलेचे नाव असून याबाबतची वर्दी पती विलास ईश्वर पाटील वय ४५ धंदा हॉटेल काम रा. कोरज यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की, दिनांक १२/१/२०२५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास घरात कोणालाही न सांगता निघून गेली आहे. ती दोन दिवस परत न आल्यामुळे विलास पाटील यांच्या वर्दीनुसार १४ जानेवारी रोजी सायंकाळी याबाबतची मिसींग चंदगड पोलिसात नोंद करून घेण्यात आली आहे. वैशाली वय ३२ वर्षे, अंगाने सडपातळ, वर्ण सावळा, उंची ५ फूट ३ इंच, सरळ नाक, काळे केस, चेहरा उभट, अंगात लाल रंगाची साडी नेसलेली व त्याच रंगाचा ब्लाउज, पायात पैंजण सॅंडल, कानात रिंगा, मराठी भाषा बोलते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास चंदगड पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment