चंदगड : सी एल वृत्तसेवा
दारू पिऊन बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्या एकावर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा भियरसिंग नावडे वय २४, राहणार देसाईवाडी, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर असे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सतीश कुरणे पोहेकॉ चंदगड यांनी दिली आहे.
याबाबत चंदगड पोलिसातून समजलेली माहिती अशी, यातील संशयित मद्यपी कृष्णा नावडे हा १४ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास मजरे कार्वे तालुका चंदगड येथे दारू पिऊन आपल्या ताब्यातील वाहन चालवताना आढळला. त्याला गस्तीवरील पोलिसांनी अटकले असता त्याने मद्यपान केल्याचे लक्षात आले. त्याची ब्रेथ एनालायझर मशीन मार्फत अल्कोहोल प्रमाण तपासणी केली असता 3082 mg/ 100 ml पॉझिटिव्ह अशी आल्यामुळे त्याला कायद्यानुसार दोषी ठरवण्यात आले. त्याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 17/2025 नुसार मोटर वाहन कायदा 1988 चे कलम 185 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास पोहेकॉ पाटील हे करत आहेत.
No comments:
Post a Comment