चंदगड : सी एल वृत्तसेवा
ताम्रपर्णी नदीच्या पात्रात बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पांडुरंग सखोबा देसाई (वय ७५) राहणार खालसा कोळींद्रे, ता. चंदगड, जि कोल्हापूर असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबतची वर्दी मुकुंद पांडुरंग देसाई, वय ४७ रा. खालसा कोळींद्रे यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलीसातून मिळालेली माहिती अशी की, दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी सकाळी प्रातःविधी करिता ताम्रपर्णी नदीच्या पात्राकडे गेले असता त्यांचा तोल जाऊन अथवा पाय घसरून नदीपात्रात बुडून मयत झाले असावेत. दिनांक ११ पासून त्यांचा शोध सुरू होता. तथापि १५ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह माडखोलकर कॉलेज चंदगड च्या समोरील बाजूस ताम्रपर्णी नदीच्या पात्रात आढळला. वर्दीवरून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 194 प्रमाणे आकस्मिक मयत अशी नोंद झाली आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशानुसार पोहेकॉ कांबळे हे अधिक तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment