चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
ब्रम्हकुमारीज चंदगड यांच्या वतीने निरोगी जीवन, आनंदी जीवन या विषयावर ब्र. कु. डॉ. सचिन परब (मुंबई) यांचे एक प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गुरुवारी १६ व १७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ७ ते ८.३० व सायं. ४ ते ५.३० या वेळेत ब्रम्हाकुमारी शिक्षक कॉलनी चंदगड येथे होणार आहे. यासाठी प्रवेश विनामुल्य असून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. खालील लिंकवर जाऊन रजिस्ट्रेशन करावे असे आवाहन प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय चंदगड यांच्या वतीने केले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी 9405290623 व 7083847603 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.
रजिस्ट्रेशन लिंक - https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScHYgARfz5-krvqgv7urZfg-pL_zFLgG0osgyDoXbMAw2rydw/viewform?usp=dialog
No comments:
Post a Comment