ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे म्हाळेवाडीत गायरान क्षेत्राला लागलेली आग आटोक्यात - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2025

ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे म्हाळेवाडीत गायरान क्षेत्राला लागलेली आग आटोक्यात

 

वनव्यात जळालेली गवत गंजी

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    म्हाळेवाडी (ता. चंदगड) येथील गायरान क्षेत्राला रविवार दि. 12/01/2025 रोजी लागलेली आग ग्राम सुरक्षा यंत्रणेमुळे आटोक्यात आणण्यात ग्रामस्थांना यश आले. सामाजिक कार्यकर्ते भरमु रामचंद्र पाटील यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणेच्या हेल्पलाइन (18002703600) नंबरवरून तात्काळ ही माहिती संपूर्ण गावाला कळवली. काही वेळातच आग लागलेल्या ठिकाणी गावकरी मदतीसाठी धावले व आग विझवली. तथापि यापूर्वी जनावरांचा चारा व गवत गंजी जळाल्या मात्र पुढील अनर्थ मोठा अनर्थ टळला. आग लागलेल्या ठिकाणापासून जवळच अनेक शेतकऱ्यांनी ठेवलेल्या पिंजर व गवतगंज्या तसेच काजूची झाडे यांचे वेळीच आग विझवल्यामुळे संरक्षण झाले.


No comments:

Post a Comment