अकराव्या कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाची 'देहभान' नाट्यप्रयोगाने सुरुवात - चंदगड लाईव्ह न्युज

13 January 2025

अकराव्या कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाची 'देहभान' नाट्यप्रयोगाने सुरुवात

 

आजरा नाट्य महोत्सव उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर

आजरा : सी एल वृत्तसेवा 

   आजरा येथे ११ व्या कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली. आजऱ्याचे जेष्ठ रंगकर्मी कै. रमेश टोपले यांच्या स्मृती जपण्यासाठी आजरा येथे गेली १० वर्षे नाट्य महोत्सवाचे आयोजन केले जाते. ज्येष्ठ रंगकर्मी बाळासाहेब आपटे (चाफवडे) यांच्या हस्ते  महोत्सवाचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी नवनाट्य कलामंच संस्थेचे अध्यक्ष अशोक चराटी होते. 

   महोत्सवाची सुरुवात सांगली येथील नाट्य विद्या मंदिर संस्थेने सादर केलेल्या उदय गोडबोले यांच्या देहभान या नाट्य प्रयोगाने झाली. महोत्सवाचे अध्यक्ष आय. के. पाटील यांनी नवनाट्य कलामंच वाटचालीचा आढावा घेतला. १९५८ पासून हा मंच नाट्यक्षेत्रात कार्यरत असून त्याचा वारसा पुढे जपण्याचे कार्य आज ही चालू आहे. नाट्य परंपरा कायम जिवंत रहावी यासाठी आजच्या तरुण पीढीने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.

     यावेळी सुतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, ज्योस्ना चराटी, अनिकेत चराटी, मामदेव सर, बाळासाहेब आपटे, योगेश पाटील व नवनाट्य कलामंचे चे सर्व पदाधिकारी आणि नाट्य रसिक उपस्थित होते.

आजचा नाट्य प्रयोग ' तिचे संदर्भ नसलेली गोष्ट '

लेखक - राजन खान

नाट्य रुपांतर - डॉ. प्रमोद खाडीलकर

दिग्दर्शक - पायल पांडे

No comments:

Post a Comment