तेऊरवाडी येथे शेतात काम करताना अचानक हृदयविकाराने महिलेचा मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

25 September 2026

तेऊरवाडी येथे शेतात काम करताना अचानक हृदयविकाराने महिलेचा मृत्यू

 


तेऊरवाडी / सी एल वृत्तसेवा

        तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील श्रीमती जक्कूबाई परसू मेणसे (वय -60) या महिलेचा शेतात भांगलन करत असताना हृदयविकाराचा तिव्र धक्का आल्याने जागीच मृत्यू पावल्याची दुदैवी घटना येथील पठार नावाच्या शेतात घडली.

    नेहमीप्रमाणे श्रीमती जक्कूबाई जेवण करून सकाळी 11. 30 वाजता पठार नावाच्या शेतामध्ये सोयाबीन भांगलन करण्यासाठी मूजूरीवर गेली होती. उन्हाची तिव्रता प्रचंड असल्याने भांगलतानाच जक्कूबाईना हृदय विकाराचा तीव्र धक्का आला. शेजारी भांगलणाऱ्या महिलांनी तात्काळ मदत केली पण त्या जागीच गतप्राण झाल्या. शेतात काम करणाऱ्या कष्टाळू महिलेचा असा दुर्दैवी मृत्य झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात  आहे. तीच्या पश्चात दोन विवाहित मुली, एक विवाहीत  मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.

No comments:

Post a Comment