![]() |
| विरुपाक्ष आपय्या गणाचारी |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित तंबाखू व्यापारी विरुपाक्ष आपय्या गणाचारी (स्वामी), वय ९० वर्षे यांचे शुक्रवार दि. २५ सप्टेंबर २०२६ सायंकाळी निधन झाले. जुन्या काळापासून परिसरातील एक महत्त्वाचे तंबाखू व्यापारी म्हणून ते प्रसिद्ध होते. ठणठणीत तब्येत असलेले वीरुपाक्ष गणाचारी अजूनही दिवसभर दुकानात ग्राहकांची सेवा करायचे शुक्रवारी सायंकाळी दुकानात असतानाच त्यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने तात्काळ बेळगाव येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तथापि उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
जुन्या काळातील कुस्तीगीर म्हणून परिचित असलेले गणाचारी कोवाड येथील कोवाड मर्चंट ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक संचालक होते. संस्थेच्या स्थापनेपासून आजतागायत गेली २६ वर्षे ते संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी तीन मुलगे सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर कोवाड येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले.

No comments:
Post a Comment