कोवाड येथील हभप दत्तात्रय वांद्रे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

26 September 2026

कोवाड येथील हभप दत्तात्रय वांद्रे यांचे निधन

दत्तात्रय जोती वांद्रे

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

कोवाड (ता. चंदगड) येथील वारकरी संप्रदायातील जेष्ठ नागरिक हरिभक्त परायण दत्तात्रय जोती वांद्रे, वय वर्षे ९२ यांचे शुक्रवार दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी कोवाड येथे वृद्धापकाळाने निधन झाले. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे निवृत्त अधिक्षक तुकाराम वांद्रे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे. त्यांच्यावर कोवाड येथील स्मशानभूमीत शनिवारी सकाळी अंतिम संस्कार करण्यात आले.


No comments:

Post a Comment