कालकुंद्री येथील सौ. वैशाली पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2025

कालकुंद्री येथील सौ. वैशाली पाटील यांचे निधन

  

सौ वैशाली पांडुरंग पाटील

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   शिवाजी गल्ली, कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी सौ वैशाली पांडुरंग पाटील (साळुगावडे), वय ४६ यांचे आजारपणामुळे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, चिरंजीव असा परिवार आहे.
दौलत अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्याचे सहा. शेती अधिकारी बाळू उर्फ पांडुरंग शिवाजी पाटील यांच्या त्या पत्नी होत. त्यांच्यावर कालकुंद्री येथील स्मशानभूमीत आज सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. रक्षाविसर्जन गुरुवार दिनांक १३ रोजी सकाळी आहे.

No comments:

Post a Comment