चंदगड : सी एल वृत्तसेवा
कोवाड (ता. चंदगड) येथील शंकरराव भैराण्णा दळवी (वय ८०) यांचे सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना दि २४ जानेवारी २०२५ रोजी निधन झाले. याबाबतची वर्दी डॉ महानंदा वैद्यकीय अधिकारी सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात दिली होती. नंतर याची नोंद चंदगड पोलिसात आकस्मात मयत म्हणून करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मयत शंकरराव दळवी यांच्या छातीत पाणी व कफ झाल्याने उपचाराकरिता 23 जानेवारी रोजी सीपीआर हॉस्पिटल येथे दाखल केले होते. उपचार सुरू असताना 24 रोजी ते मयत झाले. इंन्क्वेस्ट पंचनामा व पोस्टमार्टम करण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक यांच्या आदेशानुसार सहायक फौजदार सावंत हे पुढील तपास करत आहेत. दळवी यांचे मूळ गाव कोवाड नसून ते गेले काही वर्षे कोवाड येथे वास्तव्य करून होते.
No comments:
Post a Comment