पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग २०२५ : नगरपंचायत, बँक पतसंस्था, महावितरण, महा ई सेवा केंद्र विजयी - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2025

पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग २०२५ : नगरपंचायत, बँक पतसंस्था, महावितरण, महा ई सेवा केंद्र विजयी

 


चंदगड : सी एल वृत्तसेवा
   मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघ (रजि.) आयोजित 'पत्रकार ऑफिसर्स क्रिकेट लीग- २०२५' क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रविवार दि. ९ फेब्रुवारी २०२५ रोजी एकूण ५ सामने खेळवण्यात आले. आज झालेल्या सामन्यांत नगरपंचायत चंदगड, बँक व पतसंस्था माही सेवा केंद्र व महावितरण यांनी विजय मिळवत गटातील आपले आव्हान कायम ठेवले. तर दोन पराभव झाल्यामुळे पत्रकार संघ व एचडीएफसी बँक संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघांचे अजून एकेक सामने शिल्लक आहेत.

   आज सार्वजनिक बांधकाम विभाग विरुद्ध नगरपंचायत चंदगड यांच्यातील अटीतटीच्या झालेल्या पहिल्या सामन्यात नगरपंचायत संघाने टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तीन गडी बाद 67 धावा फटकावल्या प्रत्युत्तर दाखल पीडब्ल्यूडी संघ 6 षटकात पाच गडी बाद 64 धावा पर्यंत पोहोचू शकला. नगरपंचायतने हा सामना अवघ्या तीन धावांनी जिंकला. एक वेळ सार्वजनिक बांधकाम विभाग संघ सहज जिंकेल असे वाटत होते.

 पत्रकार संघ विरुद्ध बँक व पतसंस्था यांच्यात झालेल्या सामन्यात पत्रकार संघाने सहा षटकात एक गडी बाद 43 धावा पटकावल्या बँक व पतसंस्था संघाने सहाव्या शतकात चार गडी बाद 44 धावा पर्यंत काढून निसटता विजय मिळवला.


 तिसरा सामना बँक व पतसंस्था संघ विरुद्ध महा-ई-सेवा केंद्र यांच्यात झाला बँक व पतसंस्था संघाने प्रथम फलंदाजी करत तीन गडी बाद 66 धावा काढल्या व महा-ई-सेवा केंद्र संघाला चार गाडी बाद 56 धावसंख्येवर रोखत सामना जिंकला.
 चौथा सामना महा-ई-सेवा केंद्र व चंदगड पत्रकार संघ यांच्यात खेळवण्यात आला पत्रकार संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत सहा गडी बाद 37 धावा पटकावल्या. ई सेवा केंद्राने पाचव्या षटकात दोन गडी बाद 38 धावा करून हा सामना जिंकला.
  पाचव्या व महत्त्वाच्या सामन्यात महावितरण विरुद्ध एचडीएफसी बँक यांच्यात लढत झाली. महावितरण संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करत सहा षटकात एक गडी बाद 79 धावा फटकावल्या यात महावितरणच्या प्रज्ञावंत कांबळे यांने नाबाद 57 धावा करून यंदाच्या हंगामातील वैयक्तिक सर्वोच्च धावांची नोंद केली. प्रत्युत्तर दाखल एचडीएफसी बँकेने सात गडी बाद 52 धावांपर्यंत मजल मारली. महावितरणच्या नवनाथ चौधरी यांनी सलग तीन चेंडूवर तीन विकेट घेत यंदाच्या हंगामातील पहिली हॅट्रिक करून संघाला विजयी केले.
   या स्पर्धेतील सर्व संघांत शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याने सर्व सामने सुट्टीच्या दिवशी खेळवले जातात. आतापर्यंत 13 सामने पूर्ण झाले असून येत्या शनिवार 15 व रविवार 16 रोजी उर्वरित सामने चालू राहणार आहेत. एकूण चार गटातील प्रत्येकी दोन संघांना उप उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळणार आहे.

No comments:

Post a Comment