कुदनूर येथील दस्तगीर व नबीसाहब उस्ताद बंधूंना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

11 February 2025

कुदनूर येथील दस्तगीर व नबीसाहब उस्ताद बंधूंना मातृशोक

खतालबी सिराज उस्ताद

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   कुदनूर (ता. चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती खतालबी सिराज उस्ताद, वय ८० वर्षे यांचे सोमवार दि. १० फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या तीन-चार दिवसांपासून त्यांच्यावर के एल इ हॉस्पिटल बेळगाव येथे उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात तीन चिरंजीव, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
  प्राथमिक शिक्षक संघाचे (शिवाजीराव पाटील गट) जिल्हा उपाध्यक्ष व विद्यामंदिर तळगुळी चे अध्यापक दस्तगीर उस्ताद व राजगोळी शाळेचे अध्यापक नबीसाहब उस्ताद यांच्या त्या मातोश्री होत. कुदनूर- हंदिगनूर रोडवरील मुस्लिम समाज स्मशानभूमीत आज (दि ११ रोजी) दुपारी २.३० (अडीच) वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. 

No comments:

Post a Comment