शिप्पूर येथे जिल्हाधिकारी डॉ अमोल येडगे पाणंद रस्त्याचे उद्घाटन करताना.
तेऊरवाडी - सी एल वृत्तसेवा
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता असणे अत्यंत आवश्यक आहे. रस्ता ही तर शेतकऱ्यांची जीवन वाहीनी आहे. आपल्या शेती मशागतीसाठी व माल वाहतूकीसाठी आपल्या उभ्या पिकातून रस्त्यासाठी जागा देवून प्रशासनाला सहकार्य करणारे शिप्पूर येथील शेतकरी कौतुकास पात्र असून येथील शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ अमोल येडगे यांनी सांगितले.
कोळींद्रे ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत असणाऱ्या शिप्पूर (ता. चंदगड ) येथील पाणंद रस्त्याची पहाणी व शुभारंभ प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ येडगे बोलत होते.
हेरे मंडल अधिकारी सौ. राजश्री पचंडी यांनी मौजे शिप्पूर येथील अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला पाणंद रस्ता खुला केला.
मौजे शिप्पूर येथील गट नंबर 94 नदीपासून ते गट नंबर 12 पर्यंतचा पाणंद रस्ता गेल्या अनेक दिवसा पासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता. काही ठिकाणा या रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले होते. रस्ता नसल्याने शेती मशागत व ऊस वाहतूक करताना शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. शेतकऱ्यांची हिच अडचण लक्षात घेऊनमंडळ अधिकारी राजश्री पचंडी यानी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन तंटामुक्त अध्यक्ष बंडोपंत पाटील,विलास पाटील, ग्राम महसूल अधिकारी अंकुश लाटकर, पोलीस पाटील , सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने हा रस्ता खुला करण्यात आला. याप्रसंगी गडहिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. जिल्हाधिकारी डॉ. येडगे यांनी रस्त्यांसाठी जमिनी देण्याऱ्या शेतकऱ्यांचे आभार मानून शिप्पूर गाव व येथील शेतकरी जिल्हासाठी एक आदर्श गाव असल्याचे सांगीतले. यावेळी सरपंचा सौ. सोनाली कुंभार, अरूण पाटील (माजी उपसरपंच), संभाजी पाटील, मोतिराम पाटील, गणपत पाटील, विलास 'पाटील, शाहू पाटील, श्रावण पाटील, पो. पाटील भैरू सिताप, ग्राम पंचायत सदस्य झिलू पाटील, मधूकर पाटील, वैजू पाटील, जयेंद्र पाटील तंटामुक्त अध्यक्ष बंडोपंत पाटील, शिवाजी पाटील, गणेश पाटील, ग्रामसेवक सुनिल गुरव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत मंडल अधिकारी राजश्री पचंडी यानी केले, तर आभार पी के पाटील यानी मानले.
No comments:
Post a Comment