जागतिक महिला दिनानिमित्त कार्वेत सेवानिवृत्त शिक्षिकांमार्फत विविध उपक्रम - चंदगड लाईव्ह न्युज

09 March 2025

जागतिक महिला दिनानिमित्त कार्वेत सेवानिवृत्त शिक्षिकांमार्फत विविध उपक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त कार्वे येथे महिलांना मार्गदर्शन करताना डॉ. शितल कोकितकर सोबत मान्यवर

चंदगड : सी एल वृत्तसेवा
   चंदगड तालुका सेवानिवृत्त महिला शिक्षिकांमार्फत ८ मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले. हा कार्यक्रम चंदगड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या वतीने उभारण्यात आलेल्या कार्वे येथील विरंगुळा केंद्रात संपन्न झाला. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष शि. ल. होणगेकर होते. विरंगुळा केंद्राचे व अध्यक्ष निवृत्त केंद्रप्रमुख वसंत जोशीलकर, निवृत्त विस्ताराधिकारी एम. टी. कांबळे, डी आय पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेवानिवृत्त शिक्षिका श्रद्धा संभाजीचे यांनी केले. स्वागत सुनीता पाटील, अनिता कंग्राळकर यांनी केले. यावेळी 'महिलांच्या आरोग्यविषयक समस्या' यावर गुरुकृपा क्लिनिक कोवाड च्या डॉक्टर शितल विनोद कोकितकर यांनी स्त्रियांच्या आरोग्य विषयक अनेक समस्या, उतार वयातील नियंत्रित व्यायाम व आहार, प्राणायाम, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीचे उपाय, पंचकर्म, शुगर, बीपी, नियंत्रित ठेवण्यासाठी काय करावे? याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षिका बैलूरकर, काजळकर, रत्नमाला पाटील, सुनिता राजगोळकर आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी उपस्थित महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. 
   सकाळच्या सत्रात उपस्थित महिलांसाठी मनोरंजक खेळ, गाणी, उखाणे, आदी स्पर्धा घेण्यात आल्या. यात नंबर पटकावलेल्या महिलांना बक्षीस म्हणून मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment