कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कुदनूर (ता. चंदगड) येथील समस्त वारकरी संप्रदाय व ग्रामस्थ यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या श्री सिद्धेश्वर अखंड हरिनाम सप्ताहाची उद्या मंगळवार दिनांक ११ मार्च रोजी समाप्ती होणार आहे. या दिवशी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. हभप कै गुंडोपंत लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली सन १९८१ मध्ये या तीन दिवसीय सप्ताहाची सुरुवात झाली. यंदा ९ मार्च रोजी गावातून सवाद्य विना व पालखी मिरवणुकीने सप्ताहाचा प्रारंभ झाला. पंचक्रोशीतील भाविकांनी देवदर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन वारकरी संप्रदाय यांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment