कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
घाटकरवाडी (ता. आजरा) येथे गंगाचंद्र साहित्य कला सेवा मंचच्या वतीने राज्यस्तरीय काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंचच्या सचिव वैष्णवी पाटील यांनी दिली. विजेत्यांना सन्मान चिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे
विविध तीन पुरस्कारांसाठी स्पर्धा असून यातील श्रीहरी काव्य पुरस्कार सर्वांसाठी खुला आहे. जिजाई काव्य पुरस्कारासाठी फक्त महिला सहभागी होऊ शकतात. तर सुवर्णसाक्षी पुरस्कारासाठी नवोदित कवींचा पहिला काव्यसंग्रह पात्र ठरेल. स्पर्धेसाठी केवळ २०२४ मध्येच प्रकाशित झालेली पुस्तके पात्र असतील. एका स्पर्धकाला एकाच विभागात सहभागी होता येईल. काव्यसंग्रह पुस्तक पाठवण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२५ आहे. यावेळी सेवा मंचचे सर्व सदस्य उपस्थित होते.
स्पर्धेचे पुरस्कार वितरण मे महिन्यात भव्य कार्यक्रमात करणार असल्याची माहिती अध्यक्ष मंचचे अध्यक्ष दत्ता पाटील यांनी दिली आहे. सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी पुस्तकाची एक प्रत, कवीची संक्षिप्त माहिती, फोटो, स्वयं घोषणा पत्रासह, केवळ पोस्टानेच
प्रति,
श्री दत्तात्रय हरी पाटील, मु. घाटकरवाडी, पो. किटवडे, ता. आजरा, जि. कोल्हापूर, पिन. 416505.
या पत्त्यावर पाठविण्याचे आवाहन सचिव सौ.वैष्णवी दत्तात्रय पाटील यांनी केले आहे..
No comments:
Post a Comment