कार्वे येथील वंध्यत्व निवारण शिबिर प्रसंगी उपस्थित तज्ञ डॉक्टर तसेच चंदगड तालुका मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुका मेडिकल असोशिएशन आणि होप इन्फर्टिनिटी क्लिनिक आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बेळगाव यांच्या सौजन्याने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वंध्यत्व निवारण शिबिरास चंदगड तालुक्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्वे येथील चंदगड तालुका मेडिकल असोसिएशन च्या सभागृहात आज रविवारी दि. ९/३/२०२५ रोजी पार पडलेल्या शिबिरात या विषयाच्या तज्ञ डॉ. वर्षा पाटील यांनी मोफत वंध्यत्व तपासणी व मार्गदर्शन केले.
शिबिराचे उद्घाटन चंदगड तालुका मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सी. बी. पाटील, डॉ. आर. एन. गावडे, डॉ. विलास पाटील व पदाधिकारी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी डॉ. वर्षा पाटील म्हणाल्या, बदलत्या जीवनशैलीमुळे वंध्यत्वाची समस्या निर्माण होत आहे. यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. योग्य उपचाराने संतती प्राप्त होऊ शकते. यासाठी अत्यल्प खर्चात उपचार उपलब्ध आहेत. तज्ज्ञांशी संपर्क साधून यावर उपचार करुन घ्यावेत. चंदगड तालुक्यातील ६० दांपत्यांनी शिबिराचा लाभ घेतला. शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ. आर. एन. गावडे, डॉ. प्रकाश बांदिवडेकर, डॉ. विलास पाटील, डॉ. संजीव पाटील, डॉ. एकनाथ पाटील, डॉ. गुंडूराव पाटील, डॉ. एस. एल. पाटील यांनी परिश्रम घेतले. याकामी होप इनफर्टिनिटी सेंटरच्या डॉ. गीता शर्मा, संतोष हेगडे, कावेरी हेगडे, डॉ. राधिका, मारुती यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार डॉ. जगदीश पाटील यांनी केले.
No comments:
Post a Comment