चंदगड / प्रतिनिधी
यशवंतराव चव्हाण यांची सूक्ष्मदृष्टी महत्त्वाची होती. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर च्या स्थापनेत यशवंतराव चव्हाण यांची भूमिका महत्त्वाची होती. यशवंतराव चव्हाण आश्वासने पाळणारे नेते होते. विविध शैक्षणिक सुविधांचे निर्णय यशवंतराव चव्हाण यानी घेतले व यातून ईबीसी सारखी सवलत सुरू केली. महाराष्ट्राला उंचीवर नेऊन ठेवण्याचे काम त्यांनी केले. तसेच महाराष्ट्राची प्रतिभा त्यांनी वाढवली म्हणून त्यांच्या विचारांचा वारसा प्रत्येकाने पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. 'असे विचार कोल्हापुर येथील दैनिक महाराष्ट्र दिनमान चे संपादक, ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक डॉ विजय चोरमारे यांनी हलकर्णी (ता चंदगड ) येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक माननीय गोपाळराव पाटील उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपाध्यक्ष संजय पाटील, संचालक वामन खांडेकर, प्राचार्य डॉ बी डी अजळकर, उपप्राचार्य प्रा आर बी गावडे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचा हेतू व पाहुण्यांचा परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ चंद्रकांत पोतदार यांनी करून दिला. डॉ. चोरमारे पुढे म्हणाले, 'यशवंतराव चव्हाण यांचे खेळ, कला व शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. ठाम कठोर भूमिका घेऊन ते वाटचाल करायचे. त्यांनी निष्ठेच्या आणि नीतिमत्तेच्या बळावर महाराष्ट्राला योग्य आकार दिला. राज्याचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे ध्येय होते. सामान्य माणसाचा दुख समजून घेऊन मदतीला धावणारे ते नेते होते.'
अध्यक्षीय मनोगतात बोलताना गोपाळराव पाटील म्हणाले, 'यशवंतराव चव्हाण केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे आदर्श नेते होते. स्वकर्तृत्वाने आणि संघर्षाने त्यांनी महाराष्ट्राला चांगली दिशा दिली. त्यांचे औद्योगिक, हरितक्रांती व शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांसाठी चांगले निर्णय घेतले सहकार चळवळ सुरू केली. खेड्यापाड्यात गोरगरिबांना शिक्षणाची सोय केली. त्यांचा उदात्त हेतु होता. त्यांचे योगदान सर्वश्रेष्ठ असेच आहे. म्हणून सर्वांनी त्यांच्या विचाराचा आदर्श घेतला पाहिजे.'
याप्रसंगी संचालक मंडळ, विविध पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा पी ए बोभाटे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ राजेश घोरपडे यांनी मानले.
No comments:
Post a Comment