आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये ' इनोव्हेशन 2025' राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शन!, सी एल न्यूज चॅनलला मिडीया पार्टनरचा मान - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2025

आष्टा येथील अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयामध्ये ' इनोव्हेशन 2025' राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा आणि प्रदर्शन!, सी एल न्यूज चॅनलला मिडीया पार्टनरचा मान

सांगली : सी एल वृत्तसेवा 
      अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, आष्टा (स्वायत्त संस्था) (जि सांगली) यांच्या वतीने IEEE व IIC-ADCET च्या संयुक्त विद्यमाने "Innovation 2025" या राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १२ एप्रिल २०२५ रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे.
या स्पर्धेमध्ये देशभरातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. प्रकल्पांचे सादरीकरण संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, एड्स, एआयएमएल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, पर्यावरण, यांत्रिकी, एरोनॉटिकल, ऑटोमोबाईल, अन्न प्रक्रिया, रासायनिक, पॉलिमर, कृषी आणि इतर संबंधित शाखांमध्ये केले जाऊ शकते. या स्पर्धेमध्ये प्रत्येक गटात ४ सदस्य असणे आवश्यक आहे. स्पर्धेतील विजेत्याना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण ₹७५,०००/- किमतीची आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. स्पर्धेसाठी प्रत्येक गटाने ₹२५०/- सहभाग शुल्क भरावा लागणार आहे .
नियम व अटी:
प्रत्येक गटाने १० एप्रिल २०२५ पूर्वी आपला प्रकल्प संक्षेप (abstract) innovation@gmail.com या ईमेलवर पाठवावा.
सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पावर आधारित पोस्टर तयार करावे व त्याच्या प्रतिकृतीसह सादरीकरण करावे.
उद्योग-समस्या सोडविणाऱ्या प्रकल्पांना विशेष प्राधान्य दिले जाईल.
विद्युत पुरवठ्यासाठी २३०V/४४०V एसी विद्युत व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येईल. 
      स्पर्धेच्या आयोजना संदर्भात प्रमुख व्यक्तींच्या भावना:
"विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक व नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यासपीठ मिळावे म्हणून आम्ही ही स्पर्धा आयोजित करत आहोत. यातून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास होईल."

प्रा. एस. डी. खटवकर, समन्वयक "महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी सातत्याने कार्यरत आहे. स्पर्धेमुळे नवसंशोधनाला चालना मिळेल."

डॉ. गोपीनाथ एस., अधिष्ठाता शैक्षणिक "संगणक, एआय, रोबोटिक्स, एरोनॉटिक्स व कृषी तंत्रज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे."

डॉ. एस. एस. मोहिते, निबंधक "विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांना वाव देण्यासाठी अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन महत्त्वाचे आहे."

डॉ. एल. वाय. वाघमोरे, संचालक "संशोधन व विकास क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. स्पर्धेतून नवे स्टार्टअप्स निर्माण होण्याची शक्यता आहे."

प्रो. रफीक ए. कनाई, कार्यकारी संचालक, SDSS, इस्लामपूर "विद्यार्थ्यांनी या संधीचा पूर्ण लाभ घ्यावा आणि आपल्या कल्पनांना प्रत्यक्षात उतरवावे."

मि. विश्वनाथ आर. डांगे, संयुक्त सचिव, SDSS, इस्लामपूर "महाविद्यालयाने घेतलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनक्षमतेस चालना देईल व नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येतील."

अॅड. राजेंद्र आर. डांगे, सचिव, SDSS, इस्लामपूर यासाठी पुढील संपर्क क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अभिषेक डी. भुजबळ (विद्यार्थी समन्वयक) मो.: ७५५८५०४३१० / ९३७३९४२०६१

     या स्पर्धा अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, आष्टा, ता. वालवा, जि. सांगली, महाराष्ट्र - ४१६३०१ या ठिकाणी होणार आहेत. देशभरातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धांचा लाभ घेण्याचे आवाहन संस्था सचिव ॲड. राजेंद्र डांगे व महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment