फाटकवाडी येथे शनिवारी श्री हनुमान मंदिर वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2025

फाटकवाडी येथे शनिवारी श्री हनुमान मंदिर वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     फाटकवाडी (ता. चंदगड) येथे ग्रामस्थांच्या वतीने श्री हनुमान मंदिर वास्तुशांती, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा शनिवार ५ ते १० एप्रिल २०२५ या कालावधीत आयोजित केला आहे.

     यामध्ये काकड आरती, धार्मिक विधी, महिला भजन, हरिपाठ, प्रवचन, भोजन व हरिजागर असे दैनदिन कार्यक्रम होणार आहेत. शनिवारी दि. ५ रोजी श्री हनुमान मुर्ती तत्वन्यास विधी व आघोर होम होईल. रविवारी दि. ६ रोजी प्रायचित स्नानविधी शुध्दीकरण व मुहुर्तमेढ होईल. सोमवारी दि. ७ रोजी देवदेवतांना आवाहन व जागर होईल. मंगळवार दि. ७ रोजी मुर्ती, कळस, कलश मिरवणुक, विनासेवा, विना पुजन, टाळ-मृदंग पूजन, धान्याधिवास होईल. बुधवारी दि. ९ रोजी मंडप पुजन, गोमाता पूजन, कुमारीका पूजन, गणेशपूजन, पुण्याहवाचन, मातृकापूजन, नांदिश्राध्द, प्रासाद शुध्दी, शांतीहोम व जलाधिवास होईल. गुरुवारी दि. १० रोजी उर्वरीत यज्ञ, होमहवन, पिडींका पूजन, प्रसादाधिवासन, स्वामीजींचे स्वागत, स्वामीजींचे पाद्यपुजन, कळसोरोहण, मुर्ती प्राण प्रतिष्ठापणा, बलिदान, पुर्णाहूती, आर्शिर्वचन, मुर्ती अभिषेक, महाआरती, महागाऱ्हाणा, मंदिर लोकार्पन आणि महाप्रसादाने सांगता होईल. या सोहळ्याचा सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहून श्रवण सुखाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.

No comments:

Post a Comment