कालकुंद्री केंद्रीय प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात - चंदगड लाईव्ह न्युज

11 April 2025

कालकुंद्री केंद्रीय प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

कालकुंद्री येथे केंद्र शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ग्रामपंचायत कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती व मान्यवर

कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. शाळेच्या प्रांगणात दि. ९ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी संपन्न झालेल्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात गावातील अंगणवाडी व जिल्हा परिषद  प्राथमिक शाळेतील इयत्ता पहिली चौथीच्या चिमुकल्यांनी आपल्या कलेने ग्रामस्थांची मने जिंकली.
  कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच सौ. छाया जोशी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपसरपंच संभाजी पाटील व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व चंदगड तालुका सरपंच संघटना संस्थापक अध्यक्ष एम. जे. पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष रमेश पाटील, उपाध्यक्ष मधुकर कोकितकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दीपक कालकुंद्रीकर, सदस्य ज्योतिबा पाटील, गजानन मोरे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शरद जोशी, गावातील आजी-माजी मुख्याध्यापक व शिक्षक आदी मान्यवरांची उपस्थिती होती. स्वागत मुख्याध्यापक पुंडलिक गुरव यांनी केले. सूत्रसंचालन अध्यापिका कोमल शेठजी यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यापक राजेश काटकर, शिवाजी भरणकर, म्हात्रु गावडे यांच्यासह देवेंद्र कांबळे, विजय परीट व शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांनी परिश्रम घेतले. आपल्या मुलांचा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील सर्व पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment