गारगोटी : सी एल वृत्तसेवा
इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते आठवी विद्यार्थ्यांसाठी २५ एप्रिल ते ९ मे २०२५ दरम्यान छत्रपती शाहूजी महाराज नगर, वासनोली रोड, कडगाव, (ता. भुदरगड) येथे समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांना वर्ग अध्यापन, योगा, संगीत मार्गदर्शन, स्टेज डेअरिंग, संभाषण कौशल्य, पोहण्याचे मार्गदर्शन, चित्रकला, हस्तकला व हस्ताक्षर सुधारणा वर्ग, मैदानी खेळ, करमणूक खेळ, बुद्धिबळ मार्गदर्शन, विद्यार्थी वयोगटानुसार चित्रपट दाखवणे, व्यक्तिमत्व विकास तसेच मोबाईल शिवाय राहण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी पालकांनी आपल्या मुलांना समर कॅम्प मध्ये दाखल करावे. प्रवेश संख्या मर्यादित असल्यामुळे प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल अशी माहिती अकॅडमीचे संचालक शहाजी रामकृष्ण देसाई यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment