कालकुंद्री येथील सलून मालक यल्लाप्पा गडकरी यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2025

कालकुंद्री येथील सलून मालक यल्लाप्पा गडकरी यांचे निधन

यल्लाप्पा कृष्णा गडकरी
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा 
   कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी यल्लाप्पा कृष्णा गडकरी वय ७५ यांचे आज दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मूळचे शिनोळी, ता. चंदगड येथील रहिवाशी असलेले गडकरी गेली ४० वर्षे कालकुंद्री येथे सलून दुकान चालवत होते. सध्या कालकुंद्री येथे कायम रहिवासी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित चिरंजीव, सुना, कन्या, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा एक चिरंजीव आर्मीतून सेवानिवृत्त झाला असून एक आर्मी मध्ये कार्यरत आहे. त्यांच्यावर कालकुंद्री येथे उद्या दिनांक १६ रोजी सकाळी १०.०० वाजता कालकुंद्री स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

No comments:

Post a Comment