चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय संविधान सन्मान परिषद व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती महोत्सव कार्यक्रम सोमवारी २१ एप्रिल २०२५ रोजी चंदगड येथील र. भा. माडखोलकर महाविद्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर आयोजित करण्यात आल्याची माहिती चंदगड तालुकास्तरीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती यांच्या वतीने देण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तज्ञ मार्गदर्शक खेडूत शिक्षण मंडळ ॲड. प्रा. एन. एस. पाटील असतील. तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील, माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार राजेश पाटील, दौलतचे तज्ञ मार्गदर्शक संचालक गोपाळराव पाटील, ब्लॅक पॅंथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, चंदगडचे तहसीलदार राजेश चव्हाण, पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, गटविकास अधिकारी बाळासाहेब भोगे यांच्यासह तालुक्यातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन जयंती महोत्सव समितीच्या वतीने केले आहे.
कार्यक्रमाची रुपरेषा
दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत चित्ररथ व प्रभात फेरी होईल. सायंकाळी ५ ते ६ या वेळेत प्रतिमापूजन, स्वागत समारंभ व संविधान प्रबोधन होईल. तसेच सायंकाळी ६ ते १० या वेळेत महाराष्ट्राचे प्रसिद्ध गायक डॉ. अनिरुद्ध वनकर यांचा `मी वादळ वारा` हा भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम होईल.
No comments:
Post a Comment