चंदगड : सी एल वृत्तसेवा
मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या SSC बोर्ड परीक्षेमध्ये दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगडने घवघवीत यश संपादन केले. या परीक्षेमध्ये १२ ६ पैकी १ २१ विद्यार्थी पास होऊन शाळेचा ९६.३ टक्के निकाल लागला असून उज्वल यशाची परंपरा अखंडीत ठेवण्यात यश आले आहे. यामध्ये गुणानुक्रमे पहिले पाच विद्यार्थी
कु. श्रावणी महादेव कोपार्डे 95. 80,
स्वरा विनायक पिळणकर 95.00,
कार्तिक संदीप निट्टूरकर 94.40 ,
आर्या भालचंद्र मोहिते - 93.60,
आर्या अनिल गावडे - 90.00 या विद्यार्थ्यांनी यश मिळविले.
या सर्व विद्यार्थ्यांना शालेय समितीचे चेअरमन एन. एस. पाटील, विद्या संकुलाचे प्राचार्य आर. पी. पाटील सर्व अध्यापक व अध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments:
Post a Comment