कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती (जन्म तारीख १४ मे १६५७, जन्म ठिकाण किल्ले पुरंदर) अभूतपूर्व उत्साहात संपन्न झाली. देव गल्ली युवा मंच कालकुंद्री यांच्यावतीने दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा युवा मंचने या कार्यक्रमाला जोडून गल्लीतील माहेरवाशीनींचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. यास अनुसरून गल्लीतील शेकडो माहेरवाशींनी आपल्या कुटुंब कबिल्यासह आपल्या माहेरी दाखल झाल्या होत्या.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे पूजन करून कल्मेश्वर मंदिर पर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी देव गल्ली व कालकुंद्री गावातील अबाल वृद्ध सहभागी झाले होते. यानंतर ग्रामदैवत श्री कल्मेश्वर मंदिर समोर झालेल्या कार्यक्रम प्रसंगी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त महिलांनी पाळणा गीते गायली.
युवा मंचचे अध्यक्ष शशिकांत सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे प्रस्ताविक ना. सि. पाटील हायस्कूल होसुर चे मुख्याध्यापक जे. एस. पाटील यांनी केले. दीप प्रज्वलन सेवानिवृत्त शिक्षक स. द. पाटील, सु. ग. पाटील, जोतिबा पाटील श्रीमती शाराबाई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन माजी सैनिक बाळकृष्ण पाटील, मारुती पाटील, नरसिंग पाटील, वैजनाथ पाटील आदींच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या प्राध्यापिका मीरा सुबराव पाटील (निट्टूर) ए. सी. पाटील इंजीनियरिंग महाविद्यालय खारघर, नवी मुंबई यांनी व्याख्यानात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील ऐतिहासिक घटनांचा आढावा घेतला. आला. जोतिबा अर्जुन पाटील, मनोहर बाळू पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. यावेळी गावातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व माहेरवाशिणी महिलांचा आंब्याच्या झाडाचे रोप देऊन स्वागत व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्तम कोळी, रवी बजरंग पाटील, भरत बाबू पाटील, वैजनाथ सुबराव पाटील, जयवंत हनमंत पाटील आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक कांबळे व युवराज पाटील यांनी केले. एस. के. मुर्डेकर यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment