गडहिंग्लज येथे विजेतपद मिळविलेली चंदगड बी टीमचे खेळाडू.
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
गडहिंग्लज येथे एम. आर. शुटींग क्लब गडहिंग्लज महाराणी राधाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, गडहिंग्लज शताब्दी महोत्सवानिमित्त तर्फे आयोजित बी. एस. लोणीसो चषक शुटींग हॉलीबॉल (ढकली) स्पर्धा १४ मे रोजी आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एम. आर. शुटींग हॉलीबॉल क्लब गडहिंग्लज अजिंक्य राहिला. मांजरेवाडी हॉलीबॉल ग्रुपने द्वीतीय, सेवन शुटर हॉलीबॉल ग्रुपने तृतीय तर चंदगड टीमने चतुर्थ क्रमांक पटकावला.
हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन सुशांत लोणी यांच्या हस्ते झाले. यावेळी जेष्ठ खेळाडू अशोक येसरे, प्रदिप जगदाळे, वसंत मोहिते यांच्यासह एम. आर. हायस्कुलचे प्राचार्य श्री. कुंभार उपस्थित होते. पावसामुळे स्पर्धा थोडी उशिरा सुरु झाली. पावसामुळे मैदान थोडे ओले झाले होते. मात्र आयोजकांनी मेहनत घेवून मैदान सुकविण्यासाठी विविध घटकांचा वापर केला. रात्रीच्या थंड वातावरणामध्ये स्पर्धेत मात्र चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे विरोधी संघातील वातावरण खेळामध्ये गरम होते. स्पर्धेमध्ये 18 संघानी सहभाग घेतला होता. स्पर्धेसाठी रफीक मुल्ला, रवि चोथे व बबन कळेकर यांनी उत्कष्ट पंचाचे काम केले. स्पर्धा शांततेत पार पडली. स्पर्धा संयोजकांनी परगावाहून येणाऱ्या स्पर्धकांसाठी उत्तम शाकाहारी जेवणाची सोय केली होती. रात्री प्रकाशझोतात झालेल्या या स्पर्धेत आयोजकांनी चांगली प्रकाश व्यवस्था केली होती.
स्पर्धेचे उद्घाटन करताना सुशांत लोणी, इतर मान्यवर व खेळाडू.
चंदगड बी टीममध्ये कॅप्टन संपत पाटील, उपकॅप्टन दिपक कराड, सतीश पाटील, नंदकुमार ढेरे, विलास पाटील, शिवाजी कुट्रे, श्रीरंग नागरगोजे यांच्या टीमने उत्कृष्ट खेळाचे संयमाने प्रदर्शन करत विजयश्री खेचून आणला. यामध्ये सेंटरमॅन दिपक कराड व नेटमॅन नंदकुमार ढेरे यांनी अप्रतिम खेळी तर संपत पाटील यांनी उत्कृष्ट सर्व्हीस केल्याने व याला अन्य खेळाडूंची उत्तम साथ लाभल्याने चौथ्या क्रमांकपर्यंत चंदगड बी टीमला मजल मारता आली.
चंदगड ए टीमला साखळी सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागल्यामुळे ते दुसऱ्या फेरीमध्ये स्पर्धेतून बाहेर पडले. त्यामुळे त्यांनी चंदगड बी टीमवर आपले लक्ष केंद्रीत करुन त्यांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केल्याने चंदगड बी टीम चौथ्या क्रमांकापर्यत पोहोचली व चंदगड तालुक्यात चौथे बक्षिस आले.
No comments:
Post a Comment