देवस्थान वतन जमिन विकल्यास कारवाई, नोंदणी महानिरीक्षक यांचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2025

देवस्थान वतन जमिन विकल्यास कारवाई, नोंदणी महानिरीक्षक यांचा इशारा

  


चंदगड : सी एल वृत्तसेवा 

              महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व माननीय पालकमंत्री कोल्हापूर यांच्या उपस्थितीत १३ मे २०२५ रोजी  ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीत देवस्थान मिळकतीबाबत दिलेल्या निर्देशानुसार देवस्थान इनाम मिळकतीच्या अनुषंगाने शासन स्तरावर धोरण ठरवण्याची कार्यवाही सुरू आहे. 



        त्यामुळे सक्षम प्राधिकार्‍याची विक्री परवानगी आदेश किंवा माननीय न्यायालयाचे विक्रीस मंजुरी आदेश असतील ते वगळून राज्यातील कोणत्याही देवस्थान मिळकतीचे खरेदी विक्री व्यवहार स्वीकारू नयेत. असे दस्त स्वीकारल्यास त्याबाबतची सर्वस्वी जबाबदारी संबंधित दुय्यम निबंध यांची राहील असा स्पष्ट आदेश नोंदणी महानिरीक्षक मुख्यालय महाराष्ट्र राज्य पुणे यांनी सर्व नोंदणी उपमहानिरीक्षक  व सर्व जिल्हा व सह जिल्हा निबंधक यांना दिला आहे. या आदेशामुळे देवस्थान वतन जमिनी खरेदी विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

No comments:

Post a Comment