हौदा- टेम्पो व झाडांच्यामध्ये दाबल्याने एक जण जागीच ठार, कोवाड येथील घटना - चंदगड लाईव्ह न्युज

15 May 2025

हौदा- टेम्पो व झाडांच्यामध्ये दाबल्याने एक जण जागीच ठार, कोवाड येथील घटना

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
        कोवाड (ता. चंदगड) येथे टाटा झीप टेम्पो व पिंपळाच्या झाडा मध्ये सापडून दाबल्यामुळे एक जण जागीच ठार झाला. ही घटना पी. एस. पाटील दवाखाना (दुंडगे रोड, कोवाड) शेजारी दिवसांपूर्वी घडली. अक्षय प्रभाकर गुडाळकर वय ३० राहणार हडलगे, तालुका गडहिंग्लज असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून याबाबतची वर्दी वैभव गणपती पाटील (अंडी व्यापारी राहणार कालकुंद्री तालुका चंदगड) यांनी चंदगड पोलिसात दिली. 

  याबाबत पोलिसातून समजलेली अधिक माहिती अशी, दिनांक 10 मे रोजी घडलेल्या घटनेतील मयत अक्षय याची बहीण अक्षता हिची तब्येत अचानक बिघडल्यामुळे वर्दीदार वैभव याने आपली टाटा जीप गाडी घेऊन मागील हौद्यात  नातेवाईक राजू नारायण नेसरकर, रंजना प्रभाकर गुडुळकर, अक्षता गुडूळकर, मयत अक्षय गुडुळकर यांना बसवून टेम्पो घेऊन औषधोपचारासाठी कोवाड येथील पी एस पाटील यांच्या दवाखान्याजवळ गाडी लावून  पेशंटला घेऊन दवाखान्यात चालले. गाडी लावताना घाई गडबडीत उतारावर लावली. खाली उतरून दवाखान्यात जात असताना कोणीतरी गाडी पुढे जात आहे. असा आवाज दिल्याने मयत अक्षयने पळत जाऊन गाडीचे पुढील बाजूने हाताने गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला असता टेम्पो आवरता आला नाही. यावेळी टेम्पो त्याच्यासह जवळच्या पिंपळाच्या झाडावर जाऊन आदळला. यावेळी समोरून टेम्पोला थोपवणारा अक्षय टेम्पो व झाडाच्या मध्ये दाबला गेला. त्याच्या ढोलकीला मार लागला, नाका तोंडातून रक्त येऊ लागले. म्हणून त्याला तात्काळ बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तथापि तो औषधोपचार पूर्वीच मयत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्दीदार वैभव गणपती पाटील याने चंदगड पोलीस ठाणे येथे हजर राहून वर्दी दिल्याने वरील प्रमाणे मयत दाखल करून अकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या आदेशान्वये पोलीस उपनिरीक्षक कोळेकर हे करत आहेत.

No comments:

Post a Comment