![]() |
हर्षदा विठ्ठल बिर्जे |
![]() |
मारुती आडव्याप्पा मनवाडकर |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
होसूर (ता. चंदगड) येथील शेतकरी शिक्षक प्रसारण मंडळ संचलित मा. आमदार भरमू सुबराव पाटील हायस्कूल च्या विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षा २०२५ मध्ये देदीप्यमान यश संपादन केले. गुणवंत व सुसंस्कृत विद्यार्थी घडविण्यासाठी पंचक्रोशीत परिचित असलेल्या या हायस्कूलने स्थापनेपासून दहावी परीक्षेतील यशस्वी परंपरा कायम ठेवत अनेक विद्यार्थी घडवले आहेत.
दहावी बोर्ड परीक्षेच्या काल झालेल्या लागलेल्या निकालात शाळेचे 100% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यात वैष्णवी देवेंद्र हेबाळकर हिने 91.20% गुणासह शाळेत प्रथम क्रमांक पटकावला याशिवाय अनुक्रमे हर्षदा विठ्ठल बिर्जे- 89.80, मारुती आडव्याप्पा मनवाडकर- 83.80, रेशम शंकर लाड- 82.40, गौरव लक्ष्मण टक्केकर- 82.40, कुणाल शिवाजी अडकुरकर- 82.00, महेश नरसू पाटील- 81.80 आदी विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद यश संपादन केले सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक पी. एल. पवार, अध्यापक टी. एन. नाईक, सौ व्ही. ए. बिर्जे, पी. एम. नलवडे, एन. ए. चिंचणगी यांचे मार्गदर्शन व शिक्षकेतर कर्मचारी जयवंत अतवाडकर, राजू पाटील, ज्ञानेश्वर नाईक आदींचे सहकार्य लाभले. सालाबाद प्रमाणे यंदाही शंभर टक्के यशाची परंपरा कायम राखल्याबद्दल शाळेतील सर्व शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे ग्रामस्थ पालक व संस्था पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
फोटो
१) वैष्णवी हेबाळकर
२) हर्षदा बिर्जे
३) मारुती मनवाडकर
४) रेशम लाड
५) गौरव टक्केकर
६) कुणाल अडकुरकर
७) महेश पाटील
No comments:
Post a Comment