जागतिक कुटुंब दिनानिमित्त सांबरे येथे रंगला आगळा वेगळा कौटुंबिक स्नेह मेळावा, चार पिढया आल्या एकत्र - चंदगड लाईव्ह न्युज

16 May 2025

जागतिक कुटुंब दिनानिमित्त सांबरे येथे रंगला आगळा वेगळा कौटुंबिक स्नेह मेळावा, चार पिढया आल्या एकत्र

 

जागतिक कुटूंब दिनानिमित्य सांबरे येथे रंगलेला चार पिठ्यांचा कौटुबिक सोहळा

तेऊरवाडी /सी एल वृत्तसेवा 

      घरात एकत्र राहणे म्हणजे कुटूंब नव्हे त्याऐवजी एकत्र जगणं आणि त्या सर्वांची आपलेपणान काळजी करणे यालाच कुटुंब म्हणतात. विज्ञान तंतज्ञानाच्या या युगात नष्ट होत चाललेली कुटुंब व्यवस्था नातेसंबंध पुन्हा आजच्या पिढीला समजा वेत यासाठी सांबरे (ता. गडहिंगलज) येथे जागतिक कुटुंब दिनानिमित्य एक आगळा वेगळा कौटूंबिक स्नेह मेळावा दि १५ मे रोजी रंगला. या कौटुंबिक मेळाव्याने सर्व सामान्य जनतेच्या डोळ्यात अंजन घातले हे मात्र निश्चित.

      दरवर्षी १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन साजरा केला जातो. नोकरीच्या निमित्ताने जगात वापरताना कुटुंबातील नातेसंबंध बिघडत असताना असा सोहळा साजरा होणे गरजेचे आहे. यातूनच कुटुंब आपल्याला एकत्र बांधून ठेवते. आपल्या कुटुंबातील सदस्यांकडून मिळणारे प्रेम आपल्याला एक व्यक्ती म्हणून वाढण्यास आणि आपले भावनिक बंध मजबूत करण्यास मदत करते. कुटुंब म्हणजे आपण ज्या घरात वाढतो आणि जेव्हा आपण घरापासून दूर असतो तेव्हा तेथे परत येण्याची ओढ असते. आपले कुटुंबीय आपल्याला शेवटपर्यंत प्रेमाने आणि आपुलकीने वागवतात. ते आपल्याला मोठे होण्यास आणि चांगली व्यक्ती बनण्यास मदत करतात. वैयक्तिक विकास आणि समुदाय आणि सामाजिक एकात्मतेची भावना वाढविण्यात कुटुंबाची भूमिका खूप महत्त्वाची असते. कुटुंबाचे महत्त्व पटवून देण्यासाठी दरवर्षी १५ मे रोजी आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन (international day of families) साजरा केला जातो.

     गडहिंग्लज तालुक्यातील सांबरे गावात एक असाच आगळावेगळा कौटुंबिक स्नेहमेळावा संपन्न झाला. कै. दत्ताञय देमजी पाटील आणि यशोदा दत्ताञय पाटील यांच्या चार पिढ्यांनी एकञ येऊन कौटुंबिक स्नेहमेळावा साजरा केला.कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र आणणे, प्रेम, आपुलकी आणि स्नेह वृद्धिंगत करणे. परस्पर संवाद वाढवून नात्यांमधील बंध अधिक दृढ करणे, जुन्या आठवणींना उजाळा देणे आणि एकत्रितपणे आनंदी क्षण साजरे करणे  असे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट होते. पाटील परिवारातील गडहिंग्लज, आजरा, चंदगड तालूक्यातील  सर्व नातवंडे आणि पणञे नोकरीच्या निमित्ताने बाहेर गावी असून यांनी एकत्र येऊन परस्पर संवाद साधून नात्यातील बंध अधिक घट्ट केला. जागतिक कुटुंब दिनानिमित्य रंगलेल्या या कौंटुंबिक स्नेहमेळावा सर्वांना आदर्शवत मार्गदर्शन करणारा ठरला.

No comments:

Post a Comment