नांदवडे येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या श्री भावेश्वरी विद्यालयाचा १०० टक्के निकाल - चंदगड लाईव्ह न्युज

14 May 2025

नांदवडे येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या श्री भावेश्वरी विद्यालयाचा १०० टक्के निकाल

 


चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

        मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एस. एस. सी. परिक्षेमध्ये नांदवडे (ता. चंदगड) येथील खेडूत शिक्षण मंडळाच्या श्री भावेश्वरी विद्यालय नांदवडे या माध्यमिक विद्यालयाचा १०० टक्के निकाल लागला. विद्यालयाचे आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये २५ हून अधिक विद्यार्थांनी फस्ट क्लास मिळविला आहे. यापूर्वीही अनेकदा विद्यालयाने विद्यार्थ्यी व शिक्षकांच्या मेहनतीवर १०० टक्के निकाल लावला आहे. 

    यामध्ये यशस्वी पहिल्या ५ विद्यार्थ्यांची नावे कंसात त्यांची टक्केवारी पुढीलप्रमाणे...........

1) कु. शर्वरी शामराव पाटील (88.60 %)

2) कु. आदिती परशराम गावडे- (88.40 %)

3) कु. शिवानी अमृत पाटील - (82.80 %)

4) कु. रोहित प्रदीप गावडे (82.20 %)

5) कु. रोशनी मारुती गावडे - (80.80 %)

    यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व्ही. एन. कांबळे, पी. एम. कांबळे, सौ. एस. आर. कोरवी, बी. बी. देसाई यांच्यासह शालेय कमिटी चेअरमन रामाणा पाटील यांच्यासह अन्य सदस्यांचे मार्गदर्शन लाभले. 

    १०० टक्के निकाल असलेल्या या विद्यालयात आपल्या पाल्याचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी या विद्यालयात प्रवेश घ्या. प्रवेशासाठी मुख्याध्यापक व्ही. एन. कांबळे यांच्याशी 7350457959 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

No comments:

Post a Comment