उष्णतेमुळे कोल्ड्रिंक दुकाने हाऊसफुल्ल, अति सेवनामुळे आजारांनाही निमंत्रण - चंदगड लाईव्ह न्युज

13 May 2025

उष्णतेमुळे कोल्ड्रिंक दुकाने हाऊसफुल्ल, अति सेवनामुळे आजारांनाही निमंत्रण

संग्रहित छायाचित्र 

चंदगड : सी एल वृत्तसेवा 
        सध्या महाराष्ट्राभर उष्णतेच्या लाटेने प्राणिमात्रांच्या अंगाची लाही, लाही होत आहे. यामुळे गावोगावी  थंडाथंडा कुलकुची क्रेझ निर्माण झाली आहे. लस्सी, ताक, दही, ज्युस, आईस्क्रीम, रसाळ फळांच्या विक्रीत वाढ झाली आहे. रसवंती गृह, ज्युस, कोल्ड्रिंक विक्रीची दुकाने व फिरते हात गाडे हाऊसफुल्ल दिसत आहेत. आईस्क्रीम विक्रेत्यांना अच्छे दिन आल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. 
      कोल्ड्रिंक व्यवसायामध्ये दररोज लाखोची उलाढाल होत आहे. दुसरीकडे थंड पदार्थांच्या अतिसेवनाने  अनेकांना विविध आजारांनी घेरले आहे.  बर्फ, केमिकल, शाक्रीन, अस्वच्छता, आशा विविध घटकांमुळे अनेकांना विकतचे दुखने नशिबी येत आहे. त्यात रोज  बदलत्या हवामानाची भर पडत असल्यामुळे दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी वाढताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment