किटवाड येथे ग्रामस्थ व भाविकांच्या देणगीतून जिर्णोद्धार करण्यात आलेले श्री लक्ष्मी मंदिर
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
ग्रामस्थ व भाविकांच्या देणगीतून जीर्णोद्धार झालेल्या किटवाड, ता. चंदगड येथील ग्रामदेवता श्री लक्ष्मी मंदिरचा वास्तुशांती मूर्ती प्रतिष्ठापना व कळसा रोहन निमित्य २१ मे ते २४ मे २०२५ अखेर चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बुधवार दि. २१ रोजी सकाळी १० वाजता मूर्ती व कळस मिरवणूक, मूर्ती धान्याधिवास व रात्री भजन जागरण. गुरुवार दि.२२ रोजी सकाळी ८ वाजता कलश, तोरण मिरवणूक, वास्तुशांती, संकल्प विधी, गणेश पूजन, होम हवन, पंचरत्न, जलाधिवास व शय्यायाधिवास रात्री ९ वाजता ह भ प तुकाराम पवार महाराज धारवाडकर यांचे कीर्तन, त्यानंतर भजन जागरण. शुक्रवार दि. २३ रोजी सकाळी ८ वाजता मुख्य विधी, होम हवन, मूर्ती प्राणप्रतिष्ठापना, पाषाणपूजन, कळसारोहन व माहेरवाशीणी यांचे मानपान कार्यक्रम. गाभारापूजन विठोबा नारायण नांदवडेकर दांपत्याच्या हस्ते तर चौथरा पूजन गोपाळ नागोजी पाटील दांपत्य यांच्या हस्ते होणार आहे. अकरा वाजता श्री शिवसिद्ध सोमेश्वर महास्वामी भूतरामट्टी मुक्ती मठ यांच्या उपस्थितीत मूर्ती प्रतिष्ठापना व कळसारोहन होणार असून सायंकाळी महिला हरिपाठ तर रात्री ९ वाजता गोविंद महाराज गायकवाड (देवाची आळंदी पुणे) यांचे समाज प्रबोधनात्मक विनोदी भारुड आयोजित करण्यात आले आहे.
शनिवार दि. २४ मे रोजी दुपारी १२ वाजता महाप्रसाद होणार आहे. यावेळी तालुक्याचे आमदार शिवाजीराव पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील यांचे सह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन देवस्थान कमिटीचे अध्यक्ष एन के पाटील, भगवान हेब्बाळकर, महेश पाटील, मारुती दळवी, परसू पाटील आदींनी केले आहे.
No comments:
Post a Comment