![]() |
धोंडीबा हरी व्हळतकर |
चंदगड : सी. एल. वृत्तसेवा
साळगाव (ता. आजरा) या गावच्या शिवारात शनिवारी (दि. 4) रोजी रात्री एका वृद्ध शेतकऱ्याचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे साळगाव या गावावर शोककळा पसरली आहे. सदर मृताचे नाव धोंडीबा हरी व्हळतकर (वय 70) असे आहे. शनिवारी सायंकाळी साडेसात वाजता ते आपल्या काळवट नावाच्या शेताकडे पिकांच्या रखवाली साठी गेले होते. मात्र ते ठरलेल्या वेळेत घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबीय शेताकडे केले असता सदर ते घटना उघडकीस आली. सदर घटना घडताच परिक्षेत्र वन अधिकारी मनोजकुमार कोळी, वनपाल एस. एस. मुजावर, वनरक्षक घोरपडे यांच्या सह अन्य पदाधिकारी यांनी आजरा ग्रामीण रुग्णालयात करून संबंधित हल्ल्याची माहिती घेतली.
No comments:
Post a Comment