शेत व दफनभूमीकडे जाणाऱ्या वहीवाटीचा रस्ता खुला करून द्यावा, सिरसंगीतील मागासवर्गीय समाजाचे तहसीलदारांना निवेदन - चंदगड लाईव्ह न्युज

23 May 2025

शेत व दफनभूमीकडे जाणाऱ्या वहीवाटीचा रस्ता खुला करून द्यावा, सिरसंगीतील मागासवर्गीय समाजाचे तहसीलदारांना निवेदन


आजरा (गोपाळ गडकरी) : 

          सिरसंगी (ता. आजरा) येथील मागासवर्गीय समाजाची संपूर्ण जमीन म्हारकी नावाच्या क्षेत्रात आहे. या शेतीत जमीन कसण्यासाठी, पीक पाणी घेण्यासाठी तसेच जनावरांना वैरण आणण्यासाठी पूर्वीपासून असलेल्या वहिवाटीच्या रस्त्यातून ये जा होते. परंतु पूर्वीपासून असलेल्या या वहीवाटीच्या रस्त्याला एका व्यक्तीकडून बंद केल्यामुळे शेतात, दफनभूमीत आणि वैरण आणण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. यामुळे ग्रस्त समाजाने हा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी आजरा तहसीलदार, पोलीस ठाणे, पालक मंत्री व आमदार शिवाजी पाटील यांच्याकडे केली आहे.

    निवेदनात म्हटले आहे की, पूर्वीपासूनचा वहीवाटीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे जनावरांच्या वैरणीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतात  तसेच दफनभूमीत जाणे अडचणीचे झाले आहे. सदर व्यक्ती ये जा करणेस मज्जाव करत असल्याने समाजाला या व्यक्तीचा खूप त्रास होत आहे.  त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन न्याय द्यावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

    निवेदनावर रामू कांबळे, सचिन कांबळे, तुकाराम कांबळे, शोभा कांबळे, निलेश कांबळे, संतोष कांबळे, गंगाराम कांबळे, दत्तात्रय कांबळे, पद्मा कांबळे, वत्सला कांबळे, कमल कांबळे, गीता कांबळे, सुमित कांबळे, रेणुका कांबळे, अर्जुन कांबळे, श्रावण कांबळे, कृष्णा कांबळे, भिकाजी कांबळे आदींच्या सह्या आहेत.

No comments:

Post a Comment