वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त शेतकऱ्यांचे बहुजन मुक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली आजरा येथे ३० रोजी अंदोलन, सामील होण्याचे आवाहन - चंदगड लाईव्ह न्युज

25 May 2025

वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे त्रस्त शेतकऱ्यांचे बहुजन मुक्ती पार्टीच्या नेतृत्वाखाली आजरा येथे ३० रोजी अंदोलन, सामील होण्याचे आवाहन

 


आजरा : गोपाळ गडकरी/सी एल न्यूज
    वन्य प्राण्यांकडून होत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेती व पिकांच्या नुकसानीला वाचा फोडण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी च्या नेतृत्वाखाली आजरा येथे शेतकऱ्यांचा मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. दिनांक ३० मे रोजी होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन डॉक्टर उल्हास त्रिरत्ने यांनी आजरा येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत केले आहे.
   आजरा तालुका बहुजन मुक्ती पार्टी यांच्या मार्फत वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय धरणे अंदोलनात ३० मे २०२५ रोजी सर्व शेतकऱ्यांनी आंदोलनात सामील व्हा.. 
     दिनांक २४ मे २०२५ रोजी आजरा, जिल्हा कोल्हापूर येथे शेतकऱ्यांची मिटिंग घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना आंदोलनाची माहिती सांगितली. काही शेतकरी दोन-तीन महिन्यांपासून घरीही गेलेले नाहीत. वनविभागाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांची प्रचंड पिळवणूक होत आहे. त्यांना वन्य प्राण्यांमुळे झालेला नुकसानाची पूर्ण नुकसान भरपाई सुद्धा दिली जात नाही.
सगळे निकष आणि सरकारी शासन निर्णय धाब्यावर बसवून चुकीच्या पद्धतीने वनविभाग शेतकऱ्यांना त्रास देत आहे. परंतु आता आम्ही हे होऊ देणार नाही. वनविभागाच्या लोकांनी त्याची वेळीच दखल घेऊन लोकांवर होणारा अन्याय थांबवावा..  
यावेळी  डॉ. उल्हास त्रिरत्ने यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पांडुरंग पाईम,  दत्तात्रय पाईम,  बचाराम चव्हाण व इतर शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment