![]() |
| चंदगड : पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना माजी आमदार राजेश पाटील. शेजारी गोपाळराव पाटील, विक्रम चव्हाण-पाटील, दयानंद काणेकर, एम. जे. पाटील, राजेंद्र परीट, प्रवीण वाटंगी, बाळासाहेब घोडके आदी मान्यवर. |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड नगरपंचायत निवडणूकीसाठी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी आमदार राजेश पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या डॉ. नंदाताई बाभुळकर यांनी स्थापन केलेल्या राजर्षी शाहू विकास आघाडीला आता काँग्रेसचे नेते गोपाळराव पाटील यांनी पाठिंबा दिला आहे. याबाबतची माहिती चंदगड येथे बुधवारी दि. १२ झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
माजी आमदार राजेश पाटील म्हणाले, ``भाजप सोडून आम्हाला सर्व पक्षांचा, गटांचा, संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. चंदगड शहरे धर्मनिरपेक्ष असून शांतता प्रिय आहे. चंदगड नगरपंचायतवर दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्याचा आमचा मार्ग आता मोकळा आहे. सर्व नागरिकांच्या आग्रहास्तव आम्ही राजर्षी शाहू विकास आघाडी स्थापन केली आहे. आम्ही सर्व एकदिलाने मतदारांसमोर जाऊ.``
गोपाळराव पाटील म्हणाले, ``आमचे नेते सतीश पाटील यांच्याशी चर्चा करून आणि समविचारी गट एकत्र आलो आहोत. नगरपंचायत निवडणुकीत एक विचाराने सामोरे जाऊ.``
यावेळी शिनोळी येथील शरदचंद्र पवार गटाचे भैरू खांडेकर, सागर पाटील, काँग्रेसचे विक्रम चव्हाण-पाटील, एम. जे. पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र परीट, शिवानंद हुंबरवाडी, प्रवीण वाटंगी, दयानंद काणेकर, अशोक पाटील, अलीसाहेब मुल्ला, अभय देसाई, सदानंद आवटे, बाळासाहेब घोडके, भिकू गावडे, संजय चंदगडकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment