![]() |
| कै. एस. आर. देवण |
चंदगड : सी एल वृत्तसेवा
नागरदळे (ता. चंदगड) येथे दिवंगत शिक्षक एस. आर. देवण फाउंडेशन यांच्यावतीने रविवारी (दि. २१) आंतरराज्य सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित केल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील, उपाध्यक्ष रविंद्र देवण, खजिनदार प्रशांत देवण, सचिव डॉ. अभिजीत पाटील यांनी दिली.
सदर स्पर्धा नागरदळे येथील नागनाथ हायस्कूल व मराठी विद्या मंदिर आवारात होणार असून लहान गट पाचवी ते सातवी व मोठा गट आठवी ते दहावी वर्ग या दोन गटांमध्ये होतील. इयत्ता पाचवी ते दहावी साठी 30 हजार रुपयांची बक्षिसे दिली जाणार आहेत.
लहान व मोठ्या गटासाठी बक्षिसे समान असून समान असून अनुक्रमे 3 हजार, 2500 रुपये, 2 हजार, 1700 रुपये, 1500 रुपये, 1200 रुपये, 1 हजार रुपये, 900 रुपये, 700 रुपये, 500 रुपये अशा दहा क्रमांक विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीसे व स्मृतिचिन्ह व अकराव्या क्रमांकाला स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.
सकाळी 10.00 वाजता स्पर्धेचे उद्घाटन सरपंच वर्षाराणी बाबू पाटील व उपसरपंच एकनाथ पाटील यांच्या हस्ते होईल. यानंतर दुपारी एक वाजता बक्षीस वितरण होणार असून कोवाड येथील सर्वोदय शिक्षण संस्थाचे सचिव एम. व्ही. पाटील असतील. यावेळी सर्वोदय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. एन. एस. पाटील यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी कोवाड येथील किणी कर्यात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोकराव देसाई, निवृत्त मुख्याध्यापक ननरसु देवण, कोवाड येथील श्रीराम विद्यालयाचे माजी प्राचार्य ए. एस. पाटील, नागनाथ हायस्कूल नागरदळेचे माजी मुख्याध्यापक एस. एस. पाटील, नागनाथ हायस्कूल नागरदळेचे मुख्याध्यापक अजित व्ही. पाटील, नागरदळे येथील मराठी विद्या मंदिरचे मुख्याध्यापक नारायण सामंत यांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.
नाव नोंदणीसाठी पी. के. बोरगावकर (मोबाईल क्र. 9552870165) , पी. आय. पाटील (मोबाईल क्र. 7558395233), बाबू पाटील (मोबाईल क्र. 9421193365), रवींद्र धनकुटे (मोबाईल क्र. - 7499493117) यांच्याकडे नाव नोंदणीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनचे खजिनदार प्रशांत देवण व सचिव डॉ. अभिजीत पाटील यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment