![]() |
| जेलुगडे येथील आरोग्य शिबीर |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
जेलुगडे (ता. चंदगड) येथील २०१८ ला सुरू करण्यात आलेल्या सक्षम फाऊंडेशनच्या वतीने ५ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला जेलुगडे व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबीरामध्ये बी. पी., शुगर, थायरॉईड, ई. सी. जी, हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली. त्यासाठी वैद्यकीय ग्रामीण उपकेंद्र हेरेचे आरोग्य सहाय्यक जनार्दन झोले, आरोग्य सेवक ओमकार निकाडे, आरोग्य सेविका शारदा जुगळे, पुनम पाटील, डी ई ओ पंकज गावडे, महालॅब अभिषेक गावडे, आशा सेविका अश्विनी गावडे यांच्या पथकाने आरोग्य तपासणी केली. मराठी विद्या मंदिर जेलुगडे येथे हे शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे उत्तम नियोजन जेलुगडे गावचे सरपंच कृष्णा नाईक,उप सरपंच दत्तात्रय गावडे, पांडुरंग गावडे, वैशाली गावडे, तावडे मॅडम पाटणे, पोलीस पाटील रेखा गावडे व गावातील नागरिक उपस्थित होते.
सक्षम फाउंडेशन जेलुगडे अध्यक्ष परशराम गावडे, खजिनदार अंकुश प्रधान, सुधाकर बांदिवडेकर, सोपान देवळी वैजनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.


No comments:
Post a Comment