चंदगड : सी एल वृत्तसेवा
चंदगड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना अंतर्गत सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षिका यांच्यावतीने जागतिक महिला दिनानिमित्त दि. ९ मार्च २०२६ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. चंदगड तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटना संचलित सेवानिवृत्त शिक्षक बहुउद्देशिय सेवा संस्थेच्या मजरे कार्वे येथील विरंगुळा केंद्रात हा कार्यक्रम पार पडला.
सेवानिवृत्त शिक्षिका श्रद्धा सदानंद संभाजीचे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजन खेळ घेण्यात आले. यातील विजेते अनुक्रमे पुढील प्रमाणे संगीत खुर्ची- मिलाग्रीन मार्शल लोबो, भारती बैलूरकर, अनिता रामचंद्र पाटील, कप उचलणे स्पर्धा- सुनिता नाथा पाटील, सुरेखा पांडुरंग पाटील, राजश्री नारायण सोमनाचे, फुग्यातील हवेने कप पाडणे- भारती बैलूरकर, शैला हत्तरकी, सुनीता नाथा पाटील. केसात स्ट्रॉ लावणे- राजश्री नारायण सोमनाचे, सुरेखा पांडुरंग पाटील शामला सुरेश देसाई. क्रमांक पटकावलेल्या महिलांना शोभा काजळकर, प्रेमीला बामणे, सुनिता राजगोळकर, वैजयंतीमाला गुरव यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमात उखाणे, गायन, नृत्य आदी उपक्रमांत महिलांनी सहभाग घेऊन महिला दिन अविस्मरणीय बनवला.
कार्यक्रम स्थळी संघटनेचे पदाधिकारी शि. ल. होणगेकर, वसंत जोशीलकर, श्रीकांत वैजनाथ पाटील यांनी भेट देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या फोटो पूजनाने झाली. यावेळी उपस्थित महिलांना भेटवस्तूंसह शुभेच्छा देण्यात आल्या.


No comments:
Post a Comment