चंदगड : सी एल वृत्तसेवा
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने चंदगड येथे ओजस्वी सखी मंच यांच्या वतीने विविध उपक्रम राबवण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात अनेक महिलांनी आपले कलागुण सादर केले.
यावेळी सखी मंचच्या प्रमुख आयोजक सुधा नेसरीकर, रश्मी पिळणकर, वनिता सबनीस, अर्चना ढेरे आदी पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्या राजश्री लक्ष्मण गावडे, पंचायत समिती सदस्या मनस्विनी कांबळे, उपनगराध्यक्षा आयेशा नायकवडी, समृद्धी काणेकर यांच्यासह सर्व नगरसेविका उपस्थित होत्या.


No comments:
Post a Comment