चंदगड : सी एल वृत्तसेवा
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने कोरो इंडिया मुंबई, राजर्षी शाहु महाराज कला अकादमी कोल्हापूर व कै. कासूबाई नाईक सार्वजनिक वाचनालय सोनारवाडी, चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कब्बडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महिलांचा आत्मविश्वास वाढावा, त्यांची सामाजिक ओळख निर्माण व्हावी, सार्वजनिक क्षेत्रातील विकासामध्ये महिलांचा सहभाग वाढावा,त्या घराबाहेर पडाव्यात, मनातील भावनांना वाव मिळावा, मोकळेपणाने खेळाव्यात, महिला नेतृत्वाला संधी मिळावी. असा या स्पर्धेचा उद्देश होता.सदर स्पर्धेसाठी चंदगड, आजरा, भुदरगड, कागल, करवीर या तालुक्यातून 21 महिला कब्बडी संघानी सहभाग घेतला.
कोरोचे कार्यकर्ते मारुती केसरकर, श्रीकांत नाईक यांनी स्थानिक महिला कार्यकर्ते यांच्याशी सततच्या संवादातून व त्यांच्या सहकार्यातून, त्यांच्या पुढाकारातून स्पर्धेचे आयोजन अगदी खूप कमी वेळेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने केले.
सोनारवाडी मुगळी विद्यालयाच्या पटांगणात झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन वनरक्षक पूनम मदने व विशाखा भास्कर यांच्या हस्ते करण्यात आले त्यांच्या समवेत महिलाना कब्बडी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन करणाऱ्या मिता केसरकर, ज्योतिका कांबळे, निता शिवणे, प्रेमला गावडे, शुभांगी पाटील, रेश्मा राणे, संगीता धोनुक्षे या महिला कार्यकर्त्याही सहभागी होत्या,
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक वसंत पाटील, माद्याळ तर दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस सदाशिव गावडे व तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस रामू गावडे यांनी दिले तर उत्तेजनार्थ बक्षीस दयानंद पाटील, सोनारवाडी यांनी दिले.
खूप अटीतटीच्या स्पर्धेत चिकाटी आणि विश्वाच्या बळावर वीरांगना महिला कब्बडी संघ, बेलेवाडी काळम्मा यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर दुसरा क्रमांक सावित्रीच्या लेकी संघ, सोनारवाडी आणि तिसरा क्रमांक संवाद महिला संघ, गारगोटी हे संघ पारितोषकाचे मानकरी ठरले.
स्पर्धेसाठी ग्राउंड तयार करणे व हंपायर म्हणूनही महत्वाची भूमिका जयेंद्र नाईक यांनी पार पाडली तर आम्हाला नेहमीच सहकार्य करणारे महादेव शिप्पूरकर व समस्त ग्रामस्थ यांनी जेवणाची खूप छान व्यवस्था केली.
खरंतर महिलांनी घराबाहेर पडून इथपर्यंत येणं यातच त्यांनी अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे असे मत फेलो ज्योतिका कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले
या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सोनारवाडी मुगळी विद्यालय सोनारवाडी या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पुढाकार घेऊन मोलाचे सहकार्य केले.
उद्घाटन सोहळ्यात दै. पुढारीचे चंदगड तालुका प्रतिनिधी संदीप तारीहाळकर, अभी न्यूज चे अभिजीत कांबळे, दयानंद पाटील, मुक्त पत्रकार मिस्टर रजनी, संजय पाटील, रामू गावडे, मिता केसरकर, ज्योतिका कांबळे, निता शिवणे, सहभागी झाले होते तर अभिजीत कांबळे व मोहन अमृस्कर यांनी उत्तम प्रकारे सूत्रसंचालन केले. सातेरी तरुण मंडळ सोनारवाडी व ग्रामस्थ यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले.

No comments:
Post a Comment