कालकुंद्री : सी ल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथे आजी-माजी सैनिक संघटना कालकुंद्री यांच्या वतीने बांधण्यात आलेल्या सैनिक भवनचा लोकार्पण कार्यक्रम रविवार दि. १० मे २०२६ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे. चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते होणाऱ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच छाया जोशी राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार राजेश पाटील, माजी रोहियो मंत्री भरमूआण्णा पाटील, सेवानिवृत्त मेजर कल्लाप्पा पाटील, मेजर किरण पाटील, महिला व जिप. महिला व बालकल्याण सभापती विद्या पाटील, पंस. सदस्य मधुकर आंबेवडकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष डोंगरे, बेळगाव नेव्ही असो. अध्यक्ष अशोक पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास तालुक्यातील आजी माजी सैनिक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आजी माजी सैनिक संघटना कालकुंद्री यांच्या वतीने अध्यक्ष शरद जोशी, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव उदय मुतकेकर यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment