प्रतीक्षा संपली, या दिवशी लागणार दहावीचा निकाल २०२६ - चंदगड लाईव्ह न्युज

07 May 2026

प्रतीक्षा संपली, या दिवशी लागणार दहावीचा निकाल २०२६

 


मुंबई / विशेष वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) इयत्ता दहावी अर्थात SSC परीक्षेचा निकाल शुक्रवार दिनांक ८ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.

यंदा राज्यभरातून सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून विद्यार्थी व पालकांमध्ये निकालाबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी ते मार्च २०२६ दरम्यान परीक्षा पार पडली होती.


दहावीचा निकाल कुठे पाहाल?

https://results.digilocker.gov.in

https://www.mahresult.nic.in

https://sscresult.mkcl.org

https://mahahsscboard.in


 निकाल पाहण्यासाठी काय लागेल? विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी:  सीट नंबर / रोल नंबर, आईचे पहिले नाव ही माहिती आवश्यक राहणार आहे.

निकाल कसा पाहायचा? 

१) अधिकृत वेबसाईट उघडा

२) “SSC Result 2026” लिंकवर क्लिक करा

३) सीट नंबर व आईचे नाव टाका

४) Submit वर क्लिक करा

५) निकाल स्क्रीनवर दिसेल

६) मार्कशीट डाउनलोड करून प्रिंट काढा


 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला निकालाच्या वेळी वेबसाईटवर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक येण्याची शक्यता असल्याने विद्यार्थ्यांनी संयम ठेवावा. वेबसाईट उशिरा उघडल्यास काही वेळाने पुन्हा प्रयत्न करावा.

सर्व विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment