चंदगड / प्रतिनिधी
म्हाळुंगे (ता. चंदगड) येथील पोलिस पाटील गुंडू शंकर गावडे (वय वर्ष ५७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, तीन विवाहित मुली,सून, जावई, भाऊ, भावजय, नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि. ३१ मे रोजी सकाळी करण्यात आले.
गुंडू गावडे यांनी हलकर्णी (ता. चंदगड) येथील अथर्व दौलत नवचैतन्य साखर कामगार संघ इंटक युनियनचे अध्यक्षपद व कोल्हापूर जिल्हा साखर कामगार प्रतिनिधी मंडळाच्या सदस्यपदीही काम केले होते. कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्यांनी पोलिस पाटीलकीच्या काळात गावात कायदा सुव्यवस्था उत्तम रित्या सांभाळली होती. गावातील विविध धार्मिक व सामाजिक कार्यात ते नेहमी हिरीरीने भाग घेत होते.

No comments:
Post a Comment